Video: “भारत आपला बाप होता आणि राहणार”, पाकिस्तानी चाहत्यानं स्वत:च्याच संघाची काढली लाज!
आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला आणि भारतात जल्लोष साजरा झाला. रिंकू सिंहनं विजयी फटका मारला. पाकिस्तानच्या पराभवानंतर त्यांच्या चाहत्यांनी संघावर टीका केली. एका व्हिडीओमध्ये एका चाहत्यानं संघाला शिव्या दिल्या आणि पराभवासाठी सरकारलाही दोष दिला. त्यानं पाकिस्तानच्या संघाची तुलना भारताच्या पायातल्या चपलेशी केली आणि भारतीय संघाचं कौतुक केलं.