जेव्हा धोनीने जेमी रॉड्रिग्जला विचारलं होतं बॅटचं वजन; म्हणाला, “तू तर माझ्यापेक्षा…”
महेंद्रसिंह धोनीच्या साधेपणाची आणि क्रिकेटमधील वर्चस्वाची नेहमीच चर्चा होते. महिला क्रिकेट विश्वचषकात जेमिमा रॉड्रिग्जच्या शतकामुळे भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. जेमिमाने धोनीशी झालेल्या भेटीचा अनुभव सांगितला, ज्यात धोनीने तिच्या बॅटच्या वजनाबद्दल विचारले होते. धोनीच्या विनयशील स्वभावाचे कौतुक करताना जेमिमाने सांगितले की, धोनीच्या उपस्थितीने वातावरण बदलते, पण तो अत्यंत साधा आहे.
 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 