अंतिम फेरीत नीरज चोप्राकडून वारंवार फाऊल थ्रो का होत होता? स्पर्धेनंतर स्वत: सांगितले कारण
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. नीरजने ५ पैकी ४ फाऊल थ्रो केले, पण ८९.४५ मीटरच्या चांगल्या थ्रोमुळे त्याला रौप्यपदक मिळाले. नीरजने सांगितले की, माझी टेक्निक आणि रनवेही चांगला नव्हता. फक्त एक थ्रो झाला, बाकीचे मी फाऊल केले. दुखापतीमुळे त्याची कामगिरी प्रभावित झाली, पण भविष्यात तो सुधारण्याचा प्रयत्न करेल.