“लढाई हरलोय, युद्ध नाही”, श्रेयसनं पहिल्या क्वालिफायरनंतर दिला होता इशारा; Video व्हायरल!
रविवारी संध्याकाळी पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता अंतिम फेरीत त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरशी होणार आहे. मुंबई इंडियन्सने २०३ धावांचे आव्हान दिले होते, परंतु श्रेयस अय्यरच्या ८७ धावांच्या तुफानी खेळीमुळे पंजाबने हे आव्हान एक षटक राखून पूर्ण केले. श्रेयस अय्यरने संघाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिला होता.