ब्रेन स्ट्रोक यायच्या आधीच दिसतात ‘ही’ ५ लक्षणे; पहिल्या ६० मिनिटात उपचार झाले नाही तर…
Brain Stroke Symptoms: स्ट्रोक हे एक असं आजारपण आहे जे हृदयाच्या आजारांनंतर जगभरात मृत्यूचं दुसरं सर्वात मोठं कारण ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक स्ट्रोक संघटनेच्या अहवालानुसार, दरवर्षी जगभरात सुमारे १.२ कोटी लोक स्ट्रोकने आजारी पडतात आणि ५० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. यापैकी ८९ टक्के प्रकरणे विकसनशील देशांमध्ये, विशेषतः भारत आणि दक्षिण आशियात आढळतात.