आयुष्यभर कॅन्सरचा धोका राहणार नाही! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…
How to Lower Risk of Cancer: कॅन्सर हा एक असा आजार आहे, जो कुणालाही होऊ शकतो. या आजारामुळे शरीरात अनेक धोके निर्माण होतात आणि हा आजार जीवघेणा ठरू शकतो. आज कॅन्सर जगात मृत्यूचे एक मोठे कारण बनले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), २०२० मध्ये सुमारे एक कोटी लोकांचा मृत्यू कॅन्सरमुळे झाला, म्हणजे दर सहा मृत्यूंपैकी एक मृत्यू कॅन्सरमुळे झाला. अहवालानुसार, वर्ष २०५० पर्यंत नवीन कॅन्सर रुग्णांची संख्या ३.५ कोटींपर्यंत पोहोचू शकते, जी २०२२ च्या आकडेवारीपेक्षा सुमारे ७७% जास्त आहे.