डोळे बघून कळेल डायबिटीज झालाय की नाही! ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर होईल नुकसान…
Diabetes Early Symptoms: डायबिटीस हा एक ‘सायलेंट किलर’ म्हणजे शांतपणे शरीराला नुकसान करणारा आजार आहे. हा आजार शरीराच्या आतल्या भागांवर हळूहळू वाईट परिणाम करतो. तो फक्त हृदय, किडनी आणि फुप्फुसांवरच नाही, तर डोळ्यांवरही मोठा परिणाम करतो. ब्लड शुगर खूप दिवस जास्त राहिली तर डोळ्यांच्या नसांवर ताण येतो, त्यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथी, ग्लूकोमा आणि मोतीबिंदू अशा समस्या होऊ शकतात.