वारंवार पोट बिघडतंय, पचनाची समस्या होतेय? तुम्ही करताय ‘या’ चुका! सर्जरीही करावी लागू शकते
Clean Stomach Digestion: आजकालच्या धावपळीच्या जीवनात आरोग्यपूर्ण आणि सुदृढ राहण्यासाठी आहाराचे खूप महत्त्व आहे. अनेकदा लोकांना वाटतं की, पोट भरलं की झालं; पण खरं तर आपण काय खातो याचा परिणाम आपल्या विचार, भावना आणि आरोग्य यांवर होतो. नाश्ता, दुपारचं किंवा रात्रीचं जेवण फक्त वेळेवर केलं म्हणून उपयोग नाही, तर ते किती आरोग्यदायी आणि पौष्टिक आहे हेही महत्त्वाचं आहे. अन्न आपल्याला ऊर्जा देतं. तरीही अनेक लोकांना पोटभर जेवल्यावरसुद्धा थकवा जाणवतो किंवा पचनाशी संबंधित त्रास होतो.