Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp वर शेअर करा फोटो
Dasara Wishes 2025: हिंदू पंचांगानुसार, आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला दसरा सण साजरा केला जातो. दसरा हा विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते. हा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, असे मानले जाते. यंदा दसरा २ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. पौराणिक कथांनुसार, या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला. त्या विजयाचा दिवस म्हणजे विजयादशमी.