खाल्लेलं काही मिनिटांत पचेल, फक्त आहारात करा ‘या’ ३ पदार्थांचा समावेश
चुकीच्या आहार पद्धती आणि बैठ्या जीवनशैलीमुळे पोटाचे आजार वाढत आहेत. गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी पचन सुधारण्यासाठी हळद, शेवग्याची पानं आणि बडीशेप यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. हळद दाहक-विरोधी आहे, शेवग्याची पानं आतड्यांचा दाह कमी करतात, आणि बडीशेप गॅस कमी करते. मात्र, कोणतेही नैसर्गिक उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.