रात्री झोपल्यानंतर जाग येणं आरोग्यासाठी ठरतेय घातक? याचा शरीरावर नेमका काय होतोय परिणाम?
Waking Up Middle Of The Night Causes And Remedies : रात्री एकदा झोपल्यानंतर वारंवार जाग येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. यात ताणतणाव, चिंता, झोपण्यापूर्वी कॉफी किंवा चहाचं सेवन, औषधांचे सेवन, हार्मोनल बदल अशी कारणं असू शकतात. विशेषत: महिलांमध्ये मासिक पाळी किंवा मेनोपॉज, अॅसिड रिफ्लक्स, दमा किंवा मूत्राशयासंबंधित समस्या यांसारखी कारणं असू शकतात, अशी माहिती मुंबईतील परळमधील ग्लेनेगल्स हॉस्पिटल इंटरनल मेडिसिन सिनियर कन्सल्टंट डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी दिली.