Active life for healthy ageing निरोगी वृद्धत्वासाठी हालचाल हेच औषध (हेल्दी एजिंग: भाग ३)
वय वाढणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्यामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल होतात. निरोगी वृद्धत्वासाठी शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक आरोग्य, सक्रिय सामाजिक जीवन आणि भावनिक स्वास्थ्य महत्त्वाचे आहेत. नियमित व्यायाम, संतुलित हालचाल, सामाजिक सहभाग आणि सकारात्मक नातेसंबंध वृद्ध व्यक्तींना आत्मविश्वास देतात. फिजिओथिरेपीद्वारे वैयक्तिक व्यायाम, श्वसनाचे व्यायाम आणि संतुलन वाढवणारे व्यायाम दिले जातात. मन, शरीर आणि समाज यांचा समन्वय वृद्धत्वाचा खरा आधार आहे.