आईसलँडमध्ये सापडला पहिला डास!; जाणून घ्या, या घटनेमागील ५ महत्त्वाचे मुद्दे!
आईसलँड हे आजवर जगातील अशा ठिकाणांपैकी एक होते की, जिथे डास अस्तित्त्वात नाहीत. पण कदाचित म्हणूनच आईसलँडमध्ये आता प्रथमच तीन डास सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारतीयांना कदाचित फारसे काही वाटणार नाही, कारण डासांसोबतच आयुष्य आपल्या अनेक पिढ्यांनी स्वीकारलेले आहे. पण म्हणूनच आईसलँडमध्ये सापडलेले तीन डास ही इशारा घंटाच मानली जात असून त्यावर तातडीने संशोधनाला सुरुवात झाली आहे. आजवर डासांना इथे नैसर्गिकरित्या अटकाव होता पण आता त्यांचे अस्तित्व नेमकी कोणती बदललेली परिस्थिती सांगते आहे, त्याचाच हा आढावा.