फक्त लघवीच नाही तर ‘या’ ८ लक्षणांवरून कळेल ब्लड शुगर झाली आहे जास्त! डॉक्टरांनी सांगितलं…
High Blood Sugar Symptoms: डायबिटीज हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये रक्तातील साखरेचं (ग्लुकोजचं) प्रमाण खूप जास्त वाढतं. ग्लुकोज हे शरीरासाठी मुख्य ऊर्जेचं स्रोत असतं आणि हे आपल्याला खाल्लेल्या अन्नातून मिळतं. इन्सुलिन नावाचं हार्मोन, जे पॅन्क्रियास नावाच्या ग्रंथीतून तयार होतं, ते या अन्नातून मिळालेल्या ग्लुकोजला शरीराच्या पेशींमध्ये पोहोचवण्याचं काम करतं, जेणेकरून तो ऊर्जा म्हणून वापरता येईल.