किडनी खराब झाली तर हाता-पायात दिसतात ‘ही’ लक्षणे! चुकूनही दुर्लक्ष करू नका
Kidney Damage Symptoms: किडनीचं काम म्हणजे रक्त शुद्ध करणं, शरीरातून टॉक्सिन आणि जास्त पाणी बाहेर टाकणं आणि हार्मोनचं संतुलन राखणं. जेव्हा किडनी हे सगळं नीट करू शकत नाही, तेव्हा त्याला किडनी फेल्युअर म्हणतात. किडनीची खराबी एकदम होत नाही, ती हळूहळू अनेक वर्षांनी होते. चुकीचा आहार, वाईट जीवनशैली आणि काही आजार यासाठी कारणीभूत असतात. चुकीच्या आहार आणि जीवनशैलीचा अर्थ म्हणजे तळलेलं, मसालेदार खाणं, जास्त मीठ, जास्त प्रोटीन असलेला आहार, धूम्रपान, दारू आणि झोपेची कमतरता – हे सगळं किडनीवर सायलेंट किलरप्रमाणे परिणाम करतं.