७ दिवस पुरेशी झोप न घेतल्याने होऊ शकतो कॅन्सर! तज्ज्ञांनी सांगितलं, होतो गंभीर परिणाम…
Lack of Sleep Cause Cancer: धावपळीच्या आयुष्यामुळे आणि चुकीच्या खाण्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. अशा वेळी ताण येतो आणि नीट झोप येत नाही. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, निरोगी राहण्यासाठी दररोज ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे. झोपेची कमतरता आणि मोबाईलवर तासनतास वेळ घालवल्याने लिव्हर, हृदय आणि मेंदूशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. फिटनेस कोच यशवर्धन स्वामी यांनी सांगितले की, जर तुम्ही १ ते ७ दिवस झोप पूर्ण घेतली नाही, तर तुमच्या शरीरावर आणि मेंदूवर त्याचा काय परिणाम होतो.