लिव्हर खराब झालं तर शरीरात दिसतात ‘ही’ ५ लक्षणे; अजिबात दुर्लक्ष करू नका नाहीतर…
Liver Disease Symptoms: लिव्हरचे आजारपण हळूहळू वाढत जाते आणि जेव्हा कळते तेव्हा स्थिती गंभीर होऊ शकते. म्हणून जर तुम्हाला लिव्हरच्या आजाराचे लक्षण दिसले तर लगेच डॉक्टरांकडे तपासणी करा. त्याचबरोबर निरोगी जीवनशैली आणि संतुलित आहार घेतल्यास लिव्हर बराच काळ निरोगी राहू शकते. जर लिव्हर नीट काम करेनासं झालं तर शरीरात अनेक आजार एकामागोमाग सुरू होतात. साधारणपणे लोक थकवा, अपचन किंवा त्वचेवर झालेले छोटे बदल याकडे दुर्लक्ष करतात. पण, हे संकेत लिव्हरशी संबंधित गंभीर आजाराचे लक्षण असू शकतात.