दारू आणि सिगारेटपेक्षाही धोकादायक आहे ही सवय! १०२ वर्षांच्या डॉक्टरांनी सांगितला उपाय
Loneliness Reason Impacts on Health: अलीकडील अनेक संशोधनांमधून असे समोर आले आहे की, एकटेपणा आणि सामाजिक वेगळेपण (सोशल आयसोलेशन) याचा आपल्या आरोग्यावर तितकाच वाईट किंवा कधीकधी दारू पिणे किंवा सिगारेट ओढण्यापेक्षाही जास्त वाईट परिणाम होतो. एकटेपणा ही केवळ भावनांची गोष्ट नाही, तर एक मोठा आरोग्याचा धोका बनत आहे. एकटेपणामुळे सतत तणाव (क्रॉनिक स्ट्रेस) वाढतो, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.