जुलाब लगेच थांबतील! दह्यामध्ये फक्त ‘ही’ १ गोष्ट मिसळा, पोटदुखी आणि गॅसही झटक्यात होईल दूर
Loose Motion Home Remedy: पावसाळा सुरू झाला की अनेक आजार वाढतात. त्यातला सगळ्यात सामान्य आजार म्हणजे जुलाब (अतिसार). हा पचनाशी संबंधित त्रास आहे, ज्यात रुग्णाला वारंवार शौचाला जावं लागतं आणि पाण्यासारखा मल होतो.
कधी कधी हा त्रास काही तासांत किंवा काही दिवसांत आपोआप बरा होतो, पण वेळेवर लक्ष दिलं नाही तर शरीर कमकुवत होऊ शकतं. अशा वेळी घरगुती उपाय आणि योग्य आहार खूप उपयोगी पडतात. याबाबत लोकल 18 ने डॉक्टर ऋद्धी पांडे यांच्याशी बोलून याचे कारण, लक्षणं आणि बचावाचे उपाय जाणून घेतले. चला तर मग सविस्तर समजून घेऊया.