हाता पायांवर दिसतात या कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे; दुर्लक्ष केलं तर जीवावर बेतेल…
Lung Cancer Symptoms: कॅन्सर हा एक धोकादायक आणि जीवघेणा आजार आहे. तो लवकर लक्षात येत नाही आणि त्यावर उपचार करणेही सोपे नसते. त्याचप्रमाणे फुफ्फुसाच्या कॅन्सरचेही (Lung Cancer) अनेक प्रकार असतात. पण, जर सुरुवातीच्या टप्प्यातच तो ओळखता आला, तर त्यावर उपचार करता येऊ शकतो. त्यामुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणे ओळखणे खूप महत्त्वाचे असते. काही वेळा या लक्षणांचा परिणाम हात आणि पायांवरदेखील दिसू शकतो.