कुकरची शिट्टी वाजत नाहीय? मग कुकर उघडताना ही चूक अजिबात करू नका, नाहीतर होऊ शकतो स्फोट…
Pressure Cooker Not Whistling: भारतीय किचनमध्ये दररोजच्या स्वयंपाकासाठी प्रेशर कुकरचा वापर सामान्य आहे. डाळ, भात किंवा कोणतीही भाजी बनवणे असो - प्रेशर कुकर काम अगदी जलद आणि सोपे करतो. पण कधीकधी असं होतं की गॅसवर कुकर ठेवल्यानंतर त्याची शिट्टीच वाजत नाही. अशा परिस्थितीत बरेच लोक घाबरतात आणि विचार न करता पुन्हा पुन्हा कुकर उघडण्याचा किंवा कुकर हलवण्याचा प्रयत्न करू लागतात. पण ही चूक अत्यंत धोकादायक असू शकते आणि किचनमध्ये गंभीर अपघात घडवू शकते.