औषधांशिवाय अपचन, बद्धकोष्ठता, गॅसची समस्या होईल गायब, फॉलो करा फक्त या ५ सवयी
आतडे हा आपल्या पचनसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. जे दोन मुख्य भागांमध्ये विभागलेले आहे, एक लहान आतडे आणि दुसरे मोठे आतडे. लहान आतडे अन्न पचवण्याचे आणि पोषक तत्वे शोषण्याचे काम करते, तर मोठे आतडे पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स शोषून घेते आणि विष्ठा साठवते. शरीरासाठी पोषण, ऊर्जा आणि एकंदर आरोग्य राखण्यात आतडे महत्त्वाची भूमिका बजावतात. आतडे स्वच्छ ठेवल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, वजन नियंत्रित राहते, पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि त्वचेचे आरोग्य निरोगी राहते.