नख पाहून कळेल त्वचेचा कॅन्सर झालाय की नाही! सुरूवातीलाच दिसतात ‘ही’ लक्षणे
Skin Cancer Symptoms Nails: जेव्हा शरीर आतून अस्वस्थ असतं, तेव्हा बाहेरून त्याचे काही संकेत दिसू लागतात. हे वेळेवर ओळखणे खूप गरजेचे आहे. लोक कायम आपली नखं कापणे, ती साफ ठेवणे याकडे लक्ष देतात. पण, तुम्हाला माहीत आहे का, नखं पाहिल्यावर गंभीर आजार कळतात? डॉक्टर्स सांगतात की, नखं शरीराच्या आतल्या आरोग्याचे प्रतिबिंब दाखवतात. नखांमध्ये होणारे छोटे बदल कधी कधी मोठ्या आजारांची सुरुवातीची लक्षणे असतात.