शरीरात युरीक अॅसिड रुपात विष पसरल्यास हाता-पायांमध्ये दिसतात ही लक्षणे; वेळीच ओळखा…
Uric Acid Symptoms: युरिक ॲसिड वाढणे (हायपरयुरिसेमिया) ही आजकालची एक सामान्य समस्या झाली आहे. चुकीचा आहार आणि बिघडलेली जीवनशैली हे त्याचे मुख्य कारणआहे. आपल्या आहारात असलेला प्युरिन नावाचा घटक यासाठी जबाबदार असतो. प्युरिन शरीरात तुटला की, त्यापासून उप उत्पादन म्हणून युरिक ॲसिड तयार होते. साधारणपणे किडनी युरिक ॲसिड गाळून, ते लघवीद्वारे बाहेर टाकते. पण, रेड मीट, मासे, बीअर, डाळी, मशरूम, पालक यांसारख्या पदार्थांचा जास्त वापर केला, तर शरीरात युरिक ॲसिड वाढू लागते.