जर तुम्ही लघवी रोखून धरत असाल तर सावधान! या ४ आजारांचा वाढू शकतो धोका, फक्त किडनीच नाही…
Urine Hold Problem on Health: कामाच्या धावपळीमध्ये आपण अनेकदा खायचं तर विसरतोच, पण लघवीसाठी वेळ काढायलाही विसरतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की कामातली ही व्यस्तता आणि लघवी थांबवण्याची सवय तुमच्या आरोग्याची शत्रू ठरू शकते? कधी कधी लघवी थांबवणं गरजेचं असू शकतं, पण जर तुम्ही ही सवय म्हणून नेहमी करत असाल, तर तुम्ही आपल्या आरोग्याशी खेळत आहात. लघवी थांबवत राहिल्याने युरीनशी संबंधित अनेक त्रास होऊ शकतात.