लघवी करताना जर तुम्हाला ‘ही’ लक्षणे दिसली तर होऊ शकतो गंभीर आजार; डॉक्टर म्हणाले…
Urine Symptoms Foam Disease: कधी कधी लघवीला फेस आलेला दिसतो किंवा ती फेसाळलेली दिसते, आणि ते सामान्य असू शकते. पण जर लघवी वारंवार किंवा सतत फेसाळलेली दिसत असेल, तर ते काही त्रासाचे लक्षण असू शकते. याची काही कारणे असू शकतात. एक म्हणजे लघवी जोरात आल्याने फेस तयार होतो, हे तात्पुरते आणि सामान्य असते. दुसरे म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास लघवी दाट होते आणि त्यात फेस दिसतो. तिसरे कारण म्हणजे आहारात जास्त प्रोटीन घेणे - जसे अंडी, मांस किंवा प्रोटीन सप्लिमेंट्स खाल्ल्यामुळे लघवी फेसाळलेली दिसू शकते.