पांढऱ्या केसांवर मेंदी, हेअर कलर लावायची गरज नाही! मोहरीच्या तेलात फक्त या २ गोष्टी मिसळा
White Hair Remedy: आजच्या काळात, लहान वयात केस पांढरे होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. मुलं असोत किंवा तरुण, महिला असोत किंवा पुरुष, सर्वांनाच या समस्येचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत लोक केसांच्या रंगाचा (हेअर कलर्सचा) वापर करतात. मेंदी वापरतात आणि नको नको ते उपाय करून पाहतात. पण या हेअर कलर्समध्ये असलेल्या रसायनांमुळे कधीकधी केस गळणे, त्वचेची ऍलर्जी आणि इतर समस्या उद्भवतात. तर अनेक प्रोडक्ट्सवर फुकटचे पैसेही खर्च होतात.