“क्रिकेटपटूंना काय गरज आहे पाकिस्तानशी खेळायची?” आदित्य ठाकरेंचा खेळाडूंनाच सवाल
आशिया कप २०२५ मध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान टी-२० सामना होणार आहे. पहलगाम हल्ल्यामुळे पाकिस्तानविरोधात देशभरात रोष आहे. शिवसेना (ठाकरे गट) सामना खेळण्याविरोधात मोर्चा काढणार आहे. आदित्य ठाकरे यांनी बीसीसीआयवर टीका करत सामना न खेळण्याची मागणी केली आहे. त्यांनी भाजपावरही विचारसरणी बदलल्याचा आरोप केला. रविवारी होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष आहे.