Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तास्थापनेची प्रक्रिया सुरू झाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे व अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाला. राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडले गेले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना संविधानाच्या मुद्द्यावर टोला लगावला आणि लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला. त्यांनी विरोधकांना पराभव मान्य करण्याचं आवाहन केलं.