“तुमची एवढी डेअरिंग”, IPS अधिकाऱ्याला दम दिल्यानंतर अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी
सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे मुरुम उत्खननावर कारवाई करत असलेल्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाई रोखण्याबाबत फोन केला होता. यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका करत राजीनाम्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हे आरोप फेटाळले असून, प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्याच्या वर्तनावर आक्षेप घेतला आहे.