Video: “काय बोलायचं काय नाही हे मला कळतं”, अजित पवार संतापले; अंबानींबद्दलच्या विधानावर..
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केलेल्या भाषणातील विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. धीरूभाई अंबानींचं उदाहरण देताना त्यांनी पेट्रोल पंपावर काम केल्याचा उल्लेख केला. मात्र, त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून टीका करण्यात आली. अजित पवारांनी स्पष्टीकरण देत, चुकीचं विधान केल्यास राजकारण सोडण्याची तयारी दर्शवली. त्यांनी आपलं विधान चुकीचं दाखवलं गेल्याचं सांगितलं.