फडणवीसांची ‘ती’ जाहिरात दिली कुणी?तर्क-वितर्कांना उधाण, रोहित पवार-बावनकुळेंमध्ये कलगीतुरा
गेल्या दोन दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांची एक जाहिरात महाराष्ट्रातील राजकीय चर्चांचा विषय बनली आहे. 'देवाभाऊ' या शब्दासह शिवाजी महाराजांच्या पायाशी फुलं अर्पण करताना फडणवीस दिसतात. विरोधकांनी या जाहिरातीवर टीका करत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले आहेत. रोहित पवारांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना जाहिरातींच्या खर्चावरून सवाल केला आहे. बावनकुळेंनी पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे, ज्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद वाढला आहे.