देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना हिंदी सक्ती..”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हिंदी भाषेच्या सक्तीविरोधातील मोर्चावर टीका केली आहे. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात हिंदी सक्ती नाही, तर त्रिभाषा सूत्र आहे. उद्धव ठाकरे सरकारने 2021 मध्ये हा अहवाल स्वीकारला होता. आता विरोध करणे हे राजकीय आहे, मराठी प्रेम नाही. फडणवीस यांनी हिंदीला विरोध करणाऱ्यांना इंग्रजीला विरोध का नाही, असा सवाल केला.