देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “शरद पवारांनी ‘तो’ शब्द का फिरवला ते मला…”
देवेंद्र फडणवीस यांनी 'आप की अदालत' या कार्यक्रमात सांगितले की, ८० तासांचं सरकार शरद पवारांच्या संमतीनेच स्थापन झालं होतं. उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसल्यामुळे ते भाजपसोबत येणार नव्हते. शरद पवारांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची सूचना केली होती. मात्र, शरद पवारांनी नंतर शब्द फिरवला आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. अजित पवारांनी मात्र शब्द फिरवला नव्हता.