“जावेद अख्तर, आमिर खानही मराठीत बोलत नाहीत, मग…”, नितेश राणेंचं मनसेला आव्हान
मीरा रोड येथील दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेवर भाजपा नेते नितेश राणे यांनी टीका करत गरीब हिंदूंना लक्ष्य करू नये, असा इशारा मनसेला दिला. जावेद अख्तर आणि आमिर खान यांचा उल्लेख करत त्यांनी मनसेला टोला लगावला.