देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका; “उद्धव ठाकरे ज्या लग्नात जातात त्यांना…”
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापन दिनाच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंना नेहमीच स्वतःला नवरदेव समजण्याची समस्या आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत बंडाळीमुळे फुटले, भाजपामुळे नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाबतीतही त्यांनी हेच सांगितलं.