रेव्ह पार्टीतून रोहिणी खडसेंच्या पतीला अटक, राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी भागातील रेव्ह पार्टीत अटक करण्यात आली आहे. या पार्टीत दारू, हुक्का आणि अंमली पदार्थांचा वापर होत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी या अटकेमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे. रोहिणी खडसे सध्या या प्रकरणाची माहिती घेत असून बोलण्यास नकार दिला आहे.