उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती; “२४ तासांत ३०० मिमि पाऊस पडल्याने ही परिस्थिती…”
मुंबईसह राज्यभरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. हवामान विभागाने १९ ऑगस्टला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईतील लोकल रेल्वेसेवा ठप्प झाली असून, प्रशासनाने नागरिकांना गरज असल्यासच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.