रोहित पवारांची पोस्ट, “२० लाख रुपये आण, या मागणीला कंटाळून विवाहितेला जीव…”
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी स्नेहा झोंडगे आत्महत्या प्रकरणावर पोस्ट केली आहे. स्नेहाचा विवाह २०२४ मध्ये झाला होता, पण सासरकडून २० लाख रुपयांची मागणी आणि छळामुळे तिने आत्महत्या केली. रोहित पवार यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणातून समाजाने काहीच धडा घेतला नसल्याचे नमूद केले आहे. स्नेहाच्या मृत्यूमुळे सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.