अनिल परब विरुद्ध शंभूराज देसाईंचा सभागृहातला राडा काय? मंत्रिमहोदयांनी सगळंच सांगितलं
विधान परिषदेच्या सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अनिल परब यांनी देसाईंना गद्दार म्हटल्याने वाद वाढला. देसाईंनी परब यांना बाहेर भेटण्याचं आव्हान दिलं. वादामुळे कामकाज तहकूब करावं लागलं. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आक्षेपार्ह शब्द रेकॉर्डवरून काढले. देसाईंनी माध्यमांना सांगितलं की ते बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत आणि अपमान सहन करणार नाहीत.