“मला विष देत असतील तर…” आमदार संजय गायकवाडांकडून मारहाणीचं समर्थन
शिवसेनेचे (शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कँटिनमधून शिळे अन्न दिल्यामुळे कर्मचाऱ्याला मारहाण केली. गायकवाड यांनी स्पष्टीकरण देताना अन्नाचा दर्जा सुधारण्याची वारंवार विनंती केली होती, असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आणि योग्य कार्यवाही करावी, असे सांगितले.