IPS अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक; अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी
IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर करमाळ्यातील जनशक्ती शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक केला आणि अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली.