Devendra Fadnavis : मुंबईत कबुतरखाने असणार की नाही? देवेंद्र फडणवीस म्हणाले; “मी स्पष्टच सांगतो…”
मुंबईत कबुतरखान्यांचा विषय चर्चेत आहे. दादर येथील कबुतरखाना महापालिकेने झाकल्यानंतर जैन समाजाने आंदोलन केले. मराठी एकीकरण समितीने आरोग्याच्या कारणास्तव बंदीचे समर्थन केले. देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य आणि आस्था दोन्ही महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आंदोलकांवर कारवाई झाली नाही. फडणवीस यांनी मराठी अस्मितेचे मुद्दे मांडले आणि उद्धव ठाकरे यांना राजकारणातले गजनी म्हटले.