लक्ष्मी बरोबरचे ‘हत्ती’ आणतील समृद्धी; का करावी या हत्तींची पूजा?
पुढील वर्षभर घरात सुख, समृद्धी नांदावी म्हणून लक्ष्मीपूजन मोठ्या भक्तिभावाने केले जाते. काळाच्या ओघात देवीच्या प्रतिमांमध्ये अनेक बदल झालेले असले, तरी पारंपरिकरित्या कमळात बसलेली किंवा उभी असलेली आणि बाजूला दोन गज असलेली लक्ष्मीची प्रतिमा पूजण्याची परंपरा आहे. अशाचं स्वरूपाचं राजा रवीवर्म्यांनी रेखाटलेलं लक्ष्मीच चित्र भारतीय जनमानसाच्या मनावर कायमचं कोरलं गेलं आहे. या चित्रात देवीच्या बाजूला असलेले हे दोन्ही गज म्हणजे हत्ती देवीवर सतत जलाअभिषेक करताना दिसतात.