गोविंद बर्गे मृत्यू प्रकरण नेमकं काय आहे? नर्तिकेच्या ब्लॅकमेलिंगमुळे आत्महत्या?
बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला येथे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांचा डोक्यात गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना ५ सप्टेंबर २०२५ रोजी घडली. गोविंद बर्गे यांचे एका नर्तिकेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रकरणात आर्थिक तणाव आणि धमक्यांमुळे गोविंद मानसिकदृष्ट्या खचले होते. पोलिसांनी घटनास्थळी एक पिस्तूल जप्त केले असून, आत्महत्या की हत्या याचा तपास सुरू आहे.