लाडकी बहीण नव्हे, ही तर ‘लाडके भाऊ’ योजना! १२,४३१ पुरुषांची घुसखोरी; वर्षभर लाटले पैसे
गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांपासून चर्चेत असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'त गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, १२,४३१ पुरुष आणि ७७,९८० अपात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला आहे. यामुळे सरकारी तिजोरीला अनुक्रमे २४.२४ कोटी आणि १४०.२८ कोटींचा फटका बसला आहे. संबंधित लाभार्थ्यांना यादीतून हटवण्यात आले आहे.