“मुख्यमंत्री पदासाठी चाटूगिरी…”, राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील वांद्रेमधील रंगशारदा सभागृहात पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलत असताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. गड-किल्ल्यांवर उभारण्यात येणाऱ्या मोदी पर्यटन केंद्रावर त्यांनी आक्षेप घेतला.