“मग कुत्रे कुठे जातील?”, बॉम्बे हाऊसच्या नुतनीकरणावेळी रतन टाटांना चिंता
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. टाटा मोटर्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी त्यांच्या आठवणी शेअर केल्या. रतन टाटा यांच्या माणुसकी, जिव्हाळा आणि भारताच्या प्रगतीविषयीच्या धड्यांचे वर्णन केले. त्यांनी कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली. त्यांच्या श्वानप्रेमाची आणि निरिक्षण शक्तीचीही आठवण चंद्रशेखरन यांनी सांगितली.