नितेश राणे RSS च्या कार्यक्रमात सहभागी, नेटकऱ्यांकडून जुन्या वक्तव्याची आठवण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिठबाव शाखेत राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे सहभागी झाले होते. संघाच्या गणवेशात आलेल्या राणे यांनी संघ स्वयंसेवकांसोबत उत्सव साजरा केला. त्यांनी संघाच्या अनुशासन, राष्ट्रभक्ती आणि चारित्र्यनिर्मितीचे कौतुक केले. त्यांच्या या उपस्थितीवर नेटकऱ्यांनी जुन्या वक्तव्यांची आठवण करून देत ट्रोल केले.