“राज आणि उद्धव एकत्र येणार नाहीत”, मंत्र्याचं मोठं विधान!
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी निवडणुकांसाठी एकत्र येतील का, याबाबत चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी या संदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, पवार आणि ठाकरे गटांनी एकत्र यावे, यात काही चुकीचे नाही. मात्र, भुजबळांच्या मते, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार नाहीत. राजकारणात काही गोष्टी ठरलेल्या असतात, असेही त्यांनी नमूद केले.